गोकुळ‌ शिरगांव या गांवाला प्राचिण अशी परंपरा असून विश्व‌वंद‌णिय‌ भ‌ग‌वान श्री. कृष्णाचे वास्त‌व्य‌ अनेक वर्षे या ठिकाणी होते. भ‌ग‌वान  कृष्ण‌ यांचे बाल‌प‌ण‌ उत्त‌र भ‌रत‌तील गोकुळ वृंदाव‌न‌ या ठिकाणी गेले. प‌ण‌ इथल्या वास्त‌व्यामुळे त्यांना मुळ ज‌न्म‌ गावाची (गोकुळ)ची आठव‌ण‌ येवून‌ या ठिकाणी ज‌शीच्या-त‌से श्री. प्रति गोकुल या ठिकाणी आहे म्हणून‌ या गांवाला गोकुळ‌ शिरगांव हे नाव‌ प्राप्त‌ झाले.

त्याच‌प्रमाणे गोकुळ‌ म‌ध्ये गोव‌र्ध‌न‌ प‌र्व‌त‌ आहे. त‌सा इथेही आहे. विशाल‌ अशी य‌मुना  न‌दी त्या ठिकाणी आहे. त्या य‌मुनेच्या काठी कालीया म‌र्द‌न‌ केलेल्या ढोह आज‌ही प‌हाय‌ला मिळ‌तो. य‌मुनेवच्या काठी क‌दंब‌ नावाचे वृ़क्ष‌ आहे ज्या व‌रती भ‌ग‌वान  कृष्ण‌ त्याच्या फांदीव‌रुन‌ गोप‌-गोपीका सम‌वेत‌ रास‌क्रिडा खेळत होते. या प‌रिस‌राम‌ध्ये भ‌ग‌वान कृष्ण‌ व गोमातेच्या पाऊल‌खुणा काळ्या पाशानाम‌ध्ये प‌हाय‌ला मिळ‌तात.

त्यांची भ‌क्तिभावाने लोक पुजा क‌रतात‌. दुध‌, द‌ही,लोनी, ताक‌ याने स‌मृद‌ध‌ अस‌लेले गांव असुन‌ आलिक‌डेच‌ कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध‌ संघाने आप‌ल्या दुधाला "गोकुळ दुध‌ " हे नाव‌ देण्यासाठी त‌त्कालील‌ स‌रपंच‌ टी. एस‌. पाटील‌ त्या काळी अग्रेस‌र होते. M.I.D.C, विमान‌त‌ळ‌, बॅंका,शास‌कीय‌ कार्याल‌य‌, राष्ट्रीय‌ म‌हामार्ग‌ नं. 4 (NH-4) हाय‌वेमुळे या गावाची भरभ‌राट‌ झाली असुन‌ प्राचिन‌ प‌रंप‌रा व विविध‌ गोष्टींनी न‌ट‌लेले असे गोकुळ‌ शिरगांव‌ हे गांव आहे. या गांवातील‌ लोकांना गाव‌चा अतिश‌य‌ अभिमान‌ आहे.